कराड/प्रतिनिधी : –
महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे (mahila merchant pathshala Karad) नवरात्र, दसरा, दिपावलीनिमित्त महिला उद्योजकांसाठी 9.90 टक्के इतक्या अल्प व्याज दराची कर्ज योजना व वाहन तारण कर्जाची 9 टक्के व्याज दराची कर्ज योजना सुरू केली असून महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संस्थापक सौ. भारती मिणीयार (Bharati minyar) यांनी केले.
वार्षिक सभा उत्साहात : महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या संस्थापक सौ. भारती मिणीयार बोलत होत्या.
201 कोटी ठेवींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य करा : संस्थेच्या विविध योजनांची माहिती देताना संस्थापक सौ. मिणीयार म्हणाल्या, 275 दिवस मुदतीसाठी 8.75 टक्के व 21 महिने मुदतीसाठी 10.10 टक्के व्याज दराची, तसेच जेष्ठ नागरिकांसाठी 575 दिवस मुदतीसाठी 10.10 टक्के व्याज दराची मर्चंट उत्सव ठेव योजना संस्थेने सुरू केली आहे. या सुवर्णसंधीचा सर्व सभासदांनी लाभ घेवून संस्थेचे 201 कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट पुर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.
सभासदांना मिळणार वैद्यकीय अनुदान : संस्थेच्या सभासदांना तब्बल 50 हजार रूपयांपर्यंतचे वैद्यकीय अनुदान मिळणार आहे. या योजनेचाही सभासदांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन संस्थापक सौ. भारती मिणीयार यांनी यावेळी केले.
290 कोटींचा एकूण व्यवसाय : संस्थेच्या आर्थिक अहवाल सालाचा आढावा घेताना संस्थेच्या चेअरमन सौ. कविता पवार (Kavita Pawar) म्हणाल्या, दि. 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये संस्थेचा एकूण निधी 31 कोटी, एकूण व्यवसाय 290 कोटी रूपये असून 325 कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट गाठण्याचे निश्चित केले आहे. संस्थेस निव्वळ नफा सर्व तरतुदी वजा जाता 3 कोटी 28 लाख रूपये इतका झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
सभासदांना 11 टक्के लाभांश जाहीर : निव्वळ एन.पी.ए.चे शून्य टक्के असून या वर्षी सभासदांना 11 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे चेअरमन सौ. पवार यांनी जाहीर केले.
बँकिंग सुविधांचा सभासदांना लाभ : संस्थेने सर्व अद्यावत बँकिंग सुविधांचा अवलंब केला असून त्याचा सभासदांना चांगला उपयोग होत आहे. ज्या सभासदांचे शेअर भांडवल 2500 रूपयांपेक्षा कमी आहे, त्यांनी ते पूर्ण करावे, असे आवाहनही सौ. पवार यांनी केले.
संस्थेची सामाजिक बांधिलकी : मर्चंट ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकीतून बाल सुधारगृहास 11 लाख रूपये व लिबर्टी मजदूर मंडळाला 7 लाख 51 हजार रूपये देणगी देण्यात आले आहे. तर प्रशासकीय इमारत सुशोभीकरणासाठी साहित्य देण्यात आले आहे आले.
यशस्वी विद्यार्थिनी व महिला शेतकऱ्यांचा सन्मान : संस्थेच्या सभासद कुमारी रचना राकेश भाटे सीए परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल आणि सौ. रूक्मिणी राजेंद्र पाटील रा. शिरवडे यांनी एक एकरमध्ये 13 लाख रुपयांचे टॉमेटो पिकाचे उत्पन्न घेतल्याबद्दल त्यांचा संस्थेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : सभेस संस्थेचे अंतर्गत व वैधानिक लेखा परिक्षक व कायदेशीर सल्लागार उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अॅड. अमिता रैनाक यांनी केले. सूत्रसंचालन अंजली बाकले यांनी केले. नोटीस वाचन व्यवस्थापक पांडुरंग यादव यांनी केले. व्हा. चेअरमन सौ. सुवर्णा सादिगले यांनी आभार मानले. सभेस सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.