शंभूराजांच्या बलिदान स्मरणार्थ कराडमध्ये मुकपदयात्रा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

हिंदू समाजाला एकत्र येण्याचे आवाहन; महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे 

कराड/प्रतिनिधी : – 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण आणि त्यांच्या न झालेल्या अंत्ययात्रेचा प्रतीकात्मक आदर व्यक्त करण्यासाठी कराड येथे मुकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वेळ व ठिकाण : ही मुकपदयात्रा फाल्गुन अमावास्येच्या दिवशी, बुधवार दि. १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. पांढरीचा श्री मारुती मंदिर, कृष्णा नाका, मंगळवार पेठ, कराड येथून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.

आवाहन : विशेष म्हणजे, या उपक्रमात माता-भगिनींनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील ऐक्य, श्रद्धा आणि इतिहासाबद्दलची जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कराड यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!