येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, तर उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड एकमताने करण्यात आली.
अभिनंदन : या निवडीनंतर संस्थेचे सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
नवीन कर्ज योजना : याप्रसंगी बोलताना नूतन अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे म्हणाले, संस्थेचा एकूण व्यवसाय ९४० कोटींच्या पुढे गेला आहे. सध्या १७ शाखा कार्यरत असून, भविष्यात आणखी शाखा विस्तारासोबतच औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त अशा नवीन कर्ज योजना राबविण्याचा मानस आहे.
विश्वासास पात्र : संचालक मंडळाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहण्यासाठी मी संस्थेस अधिक वेळ देऊन काम करण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास उपाध्यक्ष अभिजीत चाफेकर यांनी व्यक्त केला.
उपस्थिती :या निवड प्रक्रियेस संस्थेचे सर्व संचालक मंडळ सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.