केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ विंगमध्ये शुक्रवारी धडाडणार तोफ 

कराड/प्रतिनिधी : –

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. व मित्रपक्षांच्या महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ विंग (ता. कराड) येथे शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे.

आदर्श विद्यामंदिराच्या पटांगणावर सभा : विंग येथील आदर्श विद्यामंदिराच्या पटांगणावर शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता ही जाहीर सभा पार पडणार आहे. याप्रसंगी सभेच्या व्यासपीठावर जिल्ह्यातील विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती असणार आहे. या सभेला कार्यकर्ते, नागरिक, मतदार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष पै. धनंजय पाटील यांनी केले आहे. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!