कृष्णा कारखान्यात ऊसतोडणी वाहतूक करारांना उत्साहात प्रारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : – 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी व वाहतूक करार प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते तोडणी-वाहतूकदारांना करारपत्रांचे वितरण करण्यात आले.

साखर उद्योगासाठी आदर्श पॅटर्न : यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले यांनी, ऊस उत्पादक, तोडणी-वाहतूकदार आणि कामगार हे कारखान्याचे तीन मुख्य आधारस्तंभ असल्याचे सांगितले. “या तिन्ही घटकांच्या समन्वयातूनच गळीत हंगाम यशस्वी होतो. कृष्णा कारखान्याने तोडणी-वाहतूक व्यवस्थापनात कार्यक्षम व नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब केला असून, हा पॅटर्न संपूर्ण साखर उद्योगासाठी आदर्श ठरला आहे,” असे त्यांनी नमूद केले. आगामी हंगामातही सर्वांनी समन्वय ठेवून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आवश्यक कामांना वेग : मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी, गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऑफ-सीझनमधील आवश्यक कामांना वेग देण्यात आला असून, तोडणी-वाहतूक करारांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

विशेष सत्कार : कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे यांची ‘दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमाला संचालक मंडळातील सदस्य, पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, तसेच ऊसतोडणी वाहतूकदार आणि कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!