नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकाराने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; सामाजिक योगदानाचा गौरव
कराड/प्रतिनिधी : –
भाजपाचे नगरसेवक सुहास जगताप यांच्यावतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरात देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतमाता प्रतिमा व अमर जवान ज्योत प्रतिकृतीचे पूजन करून तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी तिरंग्यास मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले.
सन्मान : या प्रसंगी भारतीय वायुसेना दलाचे निवृत्त अधिकारी डी.एच. कुलकर्णी, मेजर देशपांडे, तसेच रजनीश ढवळे यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
प्रवासी बॅग वितरण : याप्रसंगी कराड शहराला राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्वच्छता पुरस्कार मिळवून देणाऱ्या नगरपालिकेच्या सर्व स्वच्छता पथकातील मुकादम, तसेच सोमवार पेठेतील स्वच्छता कर्मचारी यांचा प्रवासी बॅग देऊन गौरव करण्यात आला.












