विलासकाका अभ्यासू, तळमळ आणि सहकारभाव जपणारे नेतृत्व

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील; कोयना बँकेस सदिच्छा भेट, नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू

कराड/प्रतिनिधी : –

स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या सहकारातील योगदानाची आठवण ठेवत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे. अभ्यासू, तळमळीचे आणि सहकारभाव जपणारे नेतृत्व म्हणजे विलासकाका आज त्यांच्या नेतृत्वाची परंपरा उदयसिंह पाटील – उंडाळकर समर्थपणे पुढे नेत आहेत, हे समाधानकारक आहे, अशा भावना राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केल्या.

कोयना बँकेस सदिच्छा भेट : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून मंत्री पाटील यांनी, कोयना सहकारी बँकेस सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकनेते स्व. विलासकाका – उंडाळकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पांजली अर्पण केली.

उल्लेखनीय प्रगती : ना. पाटील म्हणाले, रिझर्व्ह बँक व सहकार खात्याच्या नियमांचे काटेकोर पालन करत कोयना सहकारी बँकेने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. देशाच्या प्रगतीत सहकार आणि शिक्षण या दोन क्षेत्रांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक बँका अडचणीत असताना शिस्त, पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या धोरणामुळे कोयना बँक सक्षमपणे उभी आहे.

बँक सक्षमपणे पुढे जात असल्याचा विश्वास : ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात विलासकाकांनी दिलेले मार्गदर्शन सदैव मोलाचे ठरले. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँक अधिक सक्षमपणे पुढे जात असल्याचा विश्वास आहे. कराड तालुक्यातील त्यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी सहकारमंत्री म्हणून मी स्वतः आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील – उंडाळकर, शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेश पाटील – वाठारकर, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक, कराड तालुका सहकारी संस्थांच्या उपनिबंधक अपर्णा यादव सतीश इंगवले (APMC), कोयना दूध संघाचे लक्ष्मण देसाई, कोयना सहकारी बँकेचे चेअरमन कृष्णा पाटील, शामराव पाटील, शहाजी शेवाळे, अनिल मोहिते, आप्पासाहेब गरुड, मोहनराव माने, हनुमंतराव चव्हाण, निवासराव निकम यांसह अनेक मान्यवर, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक राज्य बँकेचे निवृत्त अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी, प्रा. धनाजी काटकर यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!