जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत

कराड/प्रतिनिधी : –

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार तहसील कार्यालय, कराड येथे बुधवार, दि. ८ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली.

हरकती किंवा सूचना : शासनाच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार नागरिकांना आपली नावे तपासण्याची व आवश्यक हरकती किंवा सूचना देण्याची संधी देण्यात आली आहे.

महत्वाच्या तारखा : तपशीलवार कार्यक्रमानुसार; प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी दि. ८ ऑक्टोबर २०२५, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि. ८ ते १४ ऑक्टोबर, अंतिम व अधिप्रमाणित मतदार यादी, मतदान केंद्र व केंद्रनिहाय यादी दि. २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आवाहन : तहसील कार्यालयात गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नागरिकांना कार्यालयीन वेळेत आपली नावे तपासण्याचे आणि काही त्रुटी आढळल्यास हरकती दाखल करण्याचे आवाहन तहसीलदार ढवळे यांनी केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!