जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व श्री मळाईदेवी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर येथे ८ व ९ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय शासकीय टेबल टेनिस स्पर्धेत कन्याशाळा मलकापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत तृतीय क्रमांक पटकावला.
विभागीय स्पर्धेत स्थान : या यशाच्या जोरावर कन्याशाळेतील सिमरा पटेल (१४ वर्षे गट), स्वरा पाटील, वैष्णवी लावंड व समीक्षा मोरे (१७ वर्षे गट) या चार विद्यार्थिनींनी सातारा जिल्हा संघातून विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत स्थान निश्चित केले.
विजेत्या संघांचा सन्मान : स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. विजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर मार्गदर्शन देत जिल्हा पातळीवरील यशाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शन : या यशात क्रीडा विभागप्रमुख जयवंत पाटील व योगेश खराडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, तुळशीराम शिर्के, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, टेबल टेनिस प्रशिक्षक लक्ष्मण जिरंगे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिलीप चिंचकर, शिक्षक व पालक यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.