रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराडचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने व रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप महामुनी यांना ‘सोलर पॉवर्ड अटमॉस्फेरिक वॉटर हार्वेस्टर’ या विषयासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाइन पेटंट प्राप्त झाले.
अत्यंत उपयोगी उपकरण : स्वच्छ पाण्याची निर्मिती करण्यासाठी सदर उपकरण अत्यंत उपयोगी आहे. या उपकरणातील हायग्रोस्कॉपिक सॉल्ट आणि धातू सेंद्रिय फ्रेमवर्क प्रणालीच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी हवेतील ओलावा शोषून घेतला जातो. दिवसा सौर ऊर्जेच्या संपर्कात आल्यावर शोषलेले पाणी/आर्द्रता बाष्प होऊन शेवटी शुद्ध पाण्यात रूपांतरित केली जाते.
शुद्ध पाणी मिळवण्यासाठी किफायतशीर: विदयुतविरहित, कमी देखभाल खर्च यामुळे हे उपकरण पारंपारिक पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून न राहता शुद्ध पाणी मिळवण्यासाठी अत्यंत किफायतशीर आहे.
अभिनंदन : या संशोधन पेटंट यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौंसिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. रवींद्र पवार यांनी डॉ. राजमाने व डॉ. महामुनी यांना शुभेच्छा दिल्या. या शोधाबद्दल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. उत्तम मोरे, प्रा. एस. ए. पाटील, प्रा. डॉ. रमेश पोळ, प्रा. माधुरी कांबळे, डॉ. गिरीश कल्याणशेट्टी, डॉ.ए.के. पाटील रजिस्ट्रार डॉ. अरुणकुमार सकटे यांनी त्यांचे अभिनंदन केले.