कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आदिराज पाटील-उंडाळकर यांची संचालकपदी निवड

कराड/प्रतिनिधी : –

कोयना सहकारी बँक लि., कराड या बँकेची सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत नव्या नेतृत्वाची भर पडली.

निवडणूक प्रक्रिया : या निवडणुकीत अपर्णा यादव, उपनिबंधक, सहकारी संस्था, कराड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पारदर्शक आणि शांततेत प्रक्रिया पार पाडली.

नूतन संचालक मंडळ : आदिराज पाटील-उंडाळकर (उंडाळे),  तुकाराम डुबल (म्होप्रे), हणमंत देसाई (वाठार), बाळासाहेब जाधव (पाडळी), राजकुमार पाटील (अंबवडे), सुजित थोरात (कार्वे), कृष्णत पाटील (काले), साहेबराव शेवाळे (कराड), महादेव पाटील (वारुंजी), सागर जाधव (आगाशिवनगर/मलकापूर), सीमा पाटील (आटके), रेश्मा पाटील (तांबवे), संपत बडेकर (सुपने), नदीम सुतार (कराड), लालासाहेब गिरी (मरळी/चोरे) यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेत भरीव योगदान : सन १९९६ मध्ये माजी सहकार मंत्री, लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या कोयना सहकारी बँकेने गेल्या काही दशकांत स्थानिक अर्थव्यवस्थेत भरीव योगदान दिले आहे. सहकार क्षेत्रात आदर्श ठरलेली ही संस्था आता नव्या पर्वात प्रवेश करत आहे.

स्थापनेपासून ‘अ’  ऑडिट वर्ग : बँकेचे संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे बँकेने स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने ‘अ’  ऑडिट वर्ग प्राप्त केला असून, रिझर्व्ह बँकेचे सर्व नियामक निकष वेळेवर पूर्ण करत आदर्श सहकारी बँकेचा मान टिकवून ठेवला आहे.

बँकेच्या व्यवस्थापनात नव्या पिढीचे प्रतिनिधित्व : या निवडणुकीत युवानेते आदिराज पाटील-उंडाळकर यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने नव्या पिढीचे प्रतिनिधित्व बँकेच्या व्यवस्थापनात झाले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे बँकेच्या कारभारात नव्या संकल्पना, नवदृष्टी आणि तंत्रज्ञानाचा वापर यास गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांचे कार्यक्षेत्रातील योगदान आणि तरुणांशी असलेला संवाद स्थानिक तरुणाईला निश्चीत नवी दिशा देईल.

नवनिर्वाचित संचालकांचे स्वागत : अॅड. उदयसिंह पाटील यांनी नवनिर्वाचित संचालकांचे स्वागत करत, बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.

विशेष योजनांची अंमलबजावणी : नवीन संचालक मंडळाने अॅड. उदयसिंह पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार करून शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याची ग्वाही देवून माजी सहकार मंत्री स्व. विलासकाका पाटील यांना अभिप्रेत असलेल्या सहकाराच्या मुलमंत्रास अधीन राहुन आगामी काळात डिजिटल बँकिंग सेवा, कर्जप्रक्रियेत सुलभता, आणि ग्राहकसेवा सुधारणा या बाबतीत विशेष योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!