कराड अर्बनची रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडची 108 वी वार्षिक  सर्वसाधारण सभा रविवार, दि. 20 जुलै रोजी पंकज मल्टीपर्पज हॉल, कराड येथे आयोजित केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.

रिझर्व्ह बँकेकडून नवीन शाखा उघडण्याची परवानगी : कराड अर्बन बँकेस रिझर्व्ह बँकेकडून आणखीन पाच नवीन शाखा उघडण्याची परवानगी मिळाली आहे. आता सध्या एकूण 67 शाखा कार्यरत असून, नवीन पाच शाखांमुळे 72 शाखा होणार आहेत. बँकेने मागील काळात ठेवलेली उद्दिष्टये 5800 कोटी व्यवसायपूर्ती, शून्य टक्के एनपीए, मोबाईल बँकिंग सेवा, यूपीआय सेवा अशी सर्व उद्दिष्टये पूर्ण झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगत रविवार सकाळी 11.30 वा. पंकज मल्टीपर्पज हॉल, हॉटेल पंकजचे मागे, कोल्हापूर नाक्याजवळ, कराड येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ. एरम केले आहे.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, कराड अर्बन कुटुंब सल्लागार सीए. दिलीप गुरव, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे व संचालक उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!