लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपा कटिबद्ध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ.डॉ. अतुलबाबा भोसले; आणीबाणीविरोधात लढा दिलेल्या कराड दक्षिणमधील सेनानींचा सन्मान

कराड/प्रतिनिधी : –

देशावर लादलेली आणीबाणी ही भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय होता. आणीबाणी कालावधीतील लोकशाही लढ्यात कराड तालुक्यातील लोकांनी मोठा सहभाग घेतला होता. भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी व प्रगल्भ आहे. या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

सेनानींचा व कुटुंबियांचा सत्कार : देशात १९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगावा लागलेल्या, कराड तालुक्यातील सेनानींचा व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आला. आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते या सेनानींना भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती : येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित या कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र यादव, शंकर निकम, कराड शहराध्यक्ष सौ. सुषमा लोखंडे, पैलवान धनंजय पाटील, सुनील शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी श्रीरंग कुंभार, शंकर चव्हाण, शिवाजी फिरंगे, निवृत्ती फिरंगे, पांडुरंग सावंत, हेमंत उकिरडे, गोपीनाथ कुलकर्णी, मोहन साने, माधव औंधकर, प्रल्हाद भोसले यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आनंदा सुतार, दिलीप घोणे, अविनाश कराळे, रामचंद्र गिजरे, चंद्रकांत चव्हाण, प्रभाकर खेर, सदानंद भुंजे, श्रीराम येळगावकर यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!