कराड उत्तरमधील विकासकामांसाठी 1.41 कोटींचा निधी मंजूर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश 

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये तारळी धरणाचे पुनर्वसन झालेल्या गावांतील नागरी वसाहतींतील विकासकामांसाठी एक कोटी 41 लाख 14 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे.

तारळी पुनर्वसित 33 गावांना सुविधा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 33 गावांचे पुनर्वसन झाले आहेत. गेली अनेक वर्ष त्या गावांना नागरी सुविधा मिळाल्या नाहीत, त्यासाठी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांनी मंत्रालय व कलेक्टर ऑफिस येथे बैठक घेतली होती.

विविध नागरी सुविधा : संबंधित गावांना ज्या नागरी सुविधा मिळाल्या नाहीत, त्यासाठी अंमलबजावणी करण्यास सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने कराड उत्तरमधील तारळी धरणातील पुनर्वसित गावांतील नागरी सुविधांसाठी एक कोटी 41 लाख 14 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या कामांसाठी मिळाला निधी : यामध्ये सावरघर येथे आरसीसी गटर बांधणे, भांबे येथे अंतर्गत आरसीसी गटर बांधणे, सावरघर येथे विद्युत पंपास वीज पुरवठा करणे, कारंजोशी येथे पाणी पुरवठा विहिरीस वीज पुरवठा करणे, तसेच भांबे, सावरघर, कारंजोशी येथे दहन भूमीचा लोखंडी सांगाडा तयार करणे आदी कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.

उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावू : उर्वरित उरमोडी, धोम, उत्तरमांड, तारळी आदी पुनर्वसित गावांच्या उर्वरित समस्या टप्प्याटप्प्याने सोडवल्या जातील, असे आमदार घोरपडे यांनी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!