कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नियोजनानुसार सभासदांना होणार वितरण

कराड/प्रतिनिधी : –

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासदांना देण्यात येणाऱ्या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

अभिवचनाची वचनपूर्ती : जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रत्येक सभासदास दिली जाणारी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची वचनपूर्ती दरवर्षी कारखाना करत आहे. यंदाही या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे.

गावागावात नियोजनानुसार वितरित : पहिल्या दिवशी कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, तसेच वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या गावात सभासदांना साखर वितरण करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये नियोजनानुसार मोफत घरपोच साखर वितरित केली जाणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, निवासराव थोरात, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, मनोज पाटील, वैभव जाखले, जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एल. फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करून वाहने रवाना करण्यात आली.

सभासदांना साखर पोत्यांचे वितरण : वाळवा तालुक्यातील इस्लामपूरमध्ये संचालक संजय पाटील यांच्या हस्ते सभासदांना साखर पोत्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी इस्लामपूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, राजारामबापू पाटील सहकारी  साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन विश्वास पाटील, संचालक शैलेश पाटील, माजी संचालक शंकर पाटील, महेश जाधव, संपत पाटील, महादेव पाटील, उरूण पाणी पुरवठा व्हा. चेअरमन संजय पाटील, पांडुरंग जाधव, युवराज पाटील, सदाशिव पाटील, युवराज जाधव, माणिक पाटील, प्रकाश पाटील, आनंदराव पाटील व सभासद आणि कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!