सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई आणि नीट परीक्षेत सुयश 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत; पाच वर्षांपासून यशाचा चढता आलेख कायम – यादव

कराड/प्रतिनिधी : –

येथील सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी, शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी, कराडच्या विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीट परीक्षा 2025 मध्ये सुयश संपादन केले. या अकॅडमीने आपल्या पाच वर्षांच्या वाटचालीत यशाचा चढता आलेख कायम ठेवला असून हे यश अकॅडमीच्या गुणवत्तेचे प्रतीक असल्याचे मत अकॅडमीचे संचालक सुभीत यादव यांनी व्यक्त केले.

आंचल ओसवाल – 557 गुण 

वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षा : वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा एजेंसीच्या माध्यमातून नीट यूजी (NEET – UG) परीक्षा घेतली जाते. देशभरासह परदेशातील परीक्षा केंद्रांवर 4 मे 2025 रोजी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये नीट परीक्षा क्रॅक करण्यामध्ये नावलौकिक असलेल्या कराड येथील सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या तब्बल सहा विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले आहे.

सायली शिंदे – 508 गुण 

सुभीत अकॅडमीचे गुणवंत विद्यार्थी : सुभीत अकॅडमीची विद्यार्थिनी आंचल ओसवाल हिने नीट परीक्षेत 720 पैकी 557 गुण मिळवून सुयश मिळवले. तर सायली शेलार हिने 508 गुण, अफान बागवानने 502 गुण, हर्षिता लखापती हिने 444 गुण, कृष्णा महेश राऊत याने 394 गुण, तसेच पायल शिंदे हिने 340 गुण मिळवले.

अफान बागवान – 502 गुण

जेईई ॲडव्हान्समध्येही बाजी : जेईई ॲडव्हान्स परीक्षेत आर्यन पवार या सुभीत अकॅडमीच्या विद्यार्थ्याने 111 गुण मिळवत संपूर्ण देशात 2097 वा क्रमांक मिळवला आहे.

हर्षिता लखापती – 444 गुण 

गुणवंतांचे अभिनंदन : या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सुयशाबद्दल अकॅडमीचे संचालक सुभीत यादव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कृष्णा राऊत – 394 गुण 

2026 साठी रिपीटर बॅच सुरू : कराड शहरात गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी उल्लेखनीय यश मिळवले आहे. ‘जेईई आणि नीट’साठी प्रसिद्ध असलेल्या या अकॅडमीमध्ये 1 जुलैपासून 2026 साठी रिपीटर बॅच सुरू करण्यात येणार असून या ठिकाणी एका बॅचसाठी केवळ 20 विद्यार्थ्यांना मर्यादित प्रवेश दिला जातो.

पायल शिंदे – 340 गुण

आवाहन : अकॅडमीत प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट तयारीसाठी मार्गदर्शन, अभ्यास साहित्य, दैनंदिन सराव प्रश्न, जेईई आणि नीट परीक्षेसाठी तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे जेईई आणि नीट प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन अकॅडमीचे संचालक सुभीत यादव यांनी केले आहे.

आर्यन पवार – 111 गुण 

गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच होणार गौरव

जेईई आणि नीट परीक्षेमध्ये सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीतील उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच मान्यवरांच्या हस्ते भव्य कार्यक्रमात गौरव करण्यात येणार असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक सुभीत यादव यांनी दिली. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!