विविध कार्यक्रमांचे आयोजन; पारंपरिक पोशाखात, भगवा फेटा घालून सहभागी होण्याचे आवाहन
कराड/प्रतिनिधी : –
“राष्ट्रांत निर्मळ अवघा शिवसूर्य जाळ” या घोषणेने आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात कराडनगरीत ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. सोमवार (दि. ९) जून २०२५ रोजी (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) श्री शिवतीर्थ दत्त चौक, कराड येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे आयोजन : या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजसंघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.












