कराड/प्रतिनिधी : –
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनासाठी कृष्णा कारखाना परिसरात हरित पट्टा निर्माण करण्याच्या उद्देशाने, दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. यावर्षीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
देशी जातीची वृक्षलागवड : यामध्ये प्रामुख्याने गुलमोहर, कदंब, बकुळ, ताम्हण, कांचन, तसेच इतर देशी जातीची वृक्षलागवड करण्यात आली. त्याचबरोबर यु.एन.ओ. च्या आवाहनानुसार प्लास्टिकमुक्त पर्यावरण संकल्पना राबवण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले व त्याप्रमाणे सर्व खाते प्रमुखांना व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार, जनरल मॅनेजर (केन) दादासाहेब शेळके, जनरल मॅनेजर (डिस्टलरी ) विकास आभाळे, सेक्रेटरी सिद्धेश्वर शिलवंत, प्रोडक्शन मॅनेजर विकास फडतरे, एच. आर. मॅनेजर संदीप भोसले, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, पर्चेस मॅनेजर विक्रमसिंह माने, पर्यावरण अभियंता सुयोग खानविलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल निकम आदी उपस्थित होते.
