शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय जाधव, उपाध्यक्षपदी प्रदीप कुंभार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

शिक्षकांच्या आर्थिक संस्थांमध्ये महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या कराड-पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय जाधव, तर उपाध्यक्षपदी प्रदीप कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष किरण यादव, संचालक विशाल कणसे, शिक्षक सोसायटीचे माजी अध्यक्ष दिनेश थोरात, शशिकांत तोडकर, रमेश जाधव, वैशाली पवार, अंकुश नांगरे, भारत देवकांत यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी : कराड-पाटण सोसायटीच्या सभागृहामध्ये या निवडी नुकत्याच पार पडल्या. कराड-पाटण शिक्षक सहकारी सोसायटीचे अध्यक्षपद हे एक सन्मानाचे पद समजले जाते. यासाठी बरीच चुरस असते. यावेळी सुज्ञ संचालकांनी सर्वानुमते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली. यामुळेच दत्तात्रय जाधव आणि प्रदीप कुंभार यांची निवड या पदासाठी झाली आहे. यांच्या निवडीमुळे शिक्षक सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अभिनंदन : या निवडीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे तालुका नेते दत्तात्रय पाटील, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील, शिक्षक बँकेचे माजी संचालक सुभाष शेवाळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष भालचंद्र थोरात, जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे, कोषाध्यक्ष मोहन सातपुते, रमेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष संजय नांगरे, तानाजी पाटील, उत्तम नांगरे, रमेश शेवाळे, यशवंत जाधव, योगेश माने, सागर पाटोळे, प्रदीप रवलेकर, राजेश पाटील, तात्या सावंत यांनी अभिनंदन केले. या निवडीवेळी कराड पाटण सोसायटीचे सर्व संचालक, शिक्षक सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकाभिमुख कारभार करणार

कराड-पाटण शिक्षक सोसायटीचा कारभार लोकाभिमुख करून सभासदांना त्याचा फायदा मिळवून देणार. याचबरोबर सोसायटीची होणारी नवीन इमारत शिक्षकांच्या अपेक्षांनुसार पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन शिक्षक सोसायटी प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार

– दत्तात्रय जाधव (अध्यक्ष, कराड पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी)

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!