अधिकाऱ्यांना दिल्या सूचना : या बैठकीत संबंधित गटातील सर्व गावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रलंबित व रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार घोरपडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती : या बैठकीस राक्षे साहेब (विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत), मुल्ला साहेब (उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती सातारा), झोरे मॅडम (विस्तार अधिकारी), संजय पांढरे (शाखा अभियंता), तुषार निकम (सरपंच, अपशिंगे मि.), संजय घोरपडे (पंचायत समिती सदस्य), तानाजी जाधव (सरपंच, अतीत), पृथ्वीराज निकम (माजी पंचायत समिती सदस्य), सुभाष निकम, ऍड. धनाजी जाधव (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा), कमलेश निकम, ज्ञानदेव निकम, संजय निकम (सरपंच) तसेच भागातील सर्व ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, शेतकरी व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.