कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या विजयासाठी वाठार (कि.) येथील प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ नारायण गायकवाड यांनी ग्रामदैवत श्री. अंबामाता देवीच्या चरणी नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात देवीचा अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला.












