कराड/प्रतिनिधी : –
केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस, त्यानुसार स्थानिक पातळीवरही एक विचाराचा लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. यासाठी ‘ग्रामपंचायत ते विधानसभा, शत प्रतिशत भाजपा’ हे उद्दिष्ट ठेवून सशक्त भारत निर्माण करायचा असेल तर, भाजपा हीच काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन त्यादृष्टीने सर्वांनी पावले उचलावीत, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.
जाहीर पक्षप्रवेश : मलकापूर येथे आमदार अतुलबाबा भोसले यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे (NMDC) संचालक अॅड. भरत पाटील, विक्रम पावसकर, माजी आमदार आनंदराव पाटील, दिलीप येळगावकर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, सुनील काटकर, गौरवी भोसले, बाळासाहेब वाघ, नितीन कौले, सिद्धी भोसले, सुवर्णा पाटील, आदर्श सरपंच नरेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने सर्वात पुढे : येणाऱ्या काळात शेजारील देश अतिरेकी हल्ले घडवून आणतील. त्यांना भारतीय सैन्यदल चोख प्रत्युत्तर देत असल्याचे सांगत आमदार चव्हाण म्हणाले, नरेंद्र मोदी आणि सैन्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमुलाग्र बदल येणाऱ्या काळात देशभरात होताना दिसेल. पूर्वीच्या यूपीए सरकारने केवळ रोटी, कपडा आणि मकान एवढीच आश्वासने दिली. मात्र, त्यांनी सर्व बाबतीत जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. मोदींनी प्रत्येक गरिबाला घरे दिले, आयुष्मान भारतच्या माध्यमातून मोफत उपचार दिले, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरघोस निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.
दक्षिणेतील जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी : कराड दक्षिणमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजपचा आमदार निवडून आला. सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे राहिले, असे सांगत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, निवडणूक विरहित राजकारण ही भाजपची परंपरा असून त्यादृष्टीने आपण काम करत आहोत. आमदार झाल्यानंतर २४ तास लोकांची सेवा करण्याचे धोरण आपण अवलंबले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारच्या सगळ्या योजना मोठ्या प्रमाणात राबवण्याचे काम करणार आहे.
सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान : पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी पेलताना सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे सांगत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा सर्वांना मोठे करणारा पक्ष आहे. आपण सर्वजण पक्षाच्या पाठीमागे ताकतीने उभे राहा. सातारा जिल्हा भाजपचा खऱ्या अर्थाने बालेकिल्ला बनवण्यासाठी आपण पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहोत. येत्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी आ. चव्हाण यांना दिली.
अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जखिणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र पाटील, मारुती नलवडे, सरपंच शंकर झिमरे, उपसरपंच चंद्रकांत नलवडे, सुनील नलवडे, तुकाराम पाटील, दादासो पाटील, अशोक पाटील, दत्तात्रय नलवडे, पांडुरंग नलवडे, नानासो कणसे, पोपट झिमरे, सौ. रुपाली हुबाले, माजी सरपंच सुवर्णा बुधे, माजी सरपंच सुनंदा पाटील, वैशाली मोरे, छाया पाटील, सुनंदा शिंदे, अशोक शिंदे, वसंत बाबर, नांदलापूरचे सरपंच मानसिंग लावंड, विलास शिर्के, माजी सरपंच राजाराम शिर्के, माजी उपसरपंच प्रकाश ढेबे, सूरज ढगे , धोंडीराम शिर्के, माजी सरपंच उत्तम शिर्के, शरद ढेबे, आशीष ढेबे, राहुल कचरे, अशोक नलवडे, विकास लावंड आदींनी आमदार अतुलबाबा यांच्या नेतृत्वाखाली व आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला.