भाजपतर्फे मलकापुरात गुरुवारी भव्य महिला मेळावा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रदेश कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती; प्रमुख कार्यकर्त्यांचा होणार पक्ष प्रवेश

कराड/प्रतिनिधी : – 

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मलकापूर (ता. कराड) येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुरुवार दिनांक २९ मे रोजी सकाळी ११ वाजता भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण व भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा लाभार्थी मेळावा : मलकापूर-बैल बाजार रोडवरील गणपती मंदिर जवळच्या भव्य पटांगणावर होणारा हा मेळावा वचनपूर्ती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्वात मोठा कामगार व महिला लाभार्थी मेळावा ठरणार आहे. या महिला मेळाव्यात बांधकाम कामगारांचा सन्मान व साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

प्रमुख कार्यकर्त्यांचा होणार पक्ष प्रवेश : या मेळाव्यामध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत  कराड दक्षिणमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश घेण्यात येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती : मेळाव्यासाठी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा सरिता बझारच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, जागृती शुगर्सच्या चेअरपर्सन सौ. गौरवी भोसले, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. सुरभी भोसले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा माने-कदम, प्रदेश निमंत्रित सदस्या सौ. सुवर्णाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस सौ. मनीषा पांडे, पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, साताऱ्याचे साहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांची उपस्थिती असणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व भाजपा महिला पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

आवाहन : या मेळाव्यास सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात येत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!