अ‍ॅड. भरत पाटील यांची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला मिळाला राज्यमंत्री दर्जा व लाल दिवा

कराड/प्रतिनिधी : –

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अ‍ॅड. भरत पाटील (नाना) यांची भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या (NMDC) संचालकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीसह त्यांना राज्यमंत्री दर्जा आणि लाल दिव्याचा सन्मानही प्राप्त झाला आहे.

यशस्वी कामगिरी : भरत पाटील हे गेले तीन दशके भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेतृत्वक्षम पदाधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यात, तसेच इतर राज्यांमध्ये सक्रिय आहेत. पक्षाच्या विविध संघटनात्मक कार्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून राजस्थान, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.

राजकीय अनुभवाची आणि कार्यक्षमतेची दखल : भाजपाच्या विचारसरणीशी दृढ निष्ठा ठेवत त्यांनी पक्ष संघटनाच्या मजबुतीसाठी झटून कार्य केले आहे. त्यांच्या दीर्घकालीन राजकीय अनुभवाची आणि कार्यक्षमतेची दखल घेत केंद्र सरकारने त्यांची NMDC संचालकपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरवच मानली जात आहे.

मान्यवरांनी केले अभिनंदन : अ‍ॅड. पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच अनेक खासदार, आमदार आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब : या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक गौरवाची बाब ठरत असून, भविष्यात राष्ट्रीय पातळीवर खनिज विकास क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरेल, असा विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!