कराड उत्तर मतदारसंघाचा संघर्षयोद्धा : जलनायक आमदार मनोजदादा घोरपडे 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

निस्वार्थी, निगर्वी, प्रेमळ, सालस पण तितकेच करारी, जिद्दी, मुत्सद्दी असे स्वभावाचे विविध पैलू साकारलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा भिमराव घोरपडे. आज 26 मे. मा. आमदार मनोजदादांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने… 

उमदं नेतृत्व : सातारा जिल्ह्यातील पाचशे – साडेपाचशे लोक वस्तीच्या मत्त्यापूर गावातील एक सुसंस्कृत, जबाबदार, रुबाबदार, दिलदार व निर्भीड बाणा असणारं, उमदं नेतृत्व म्हणजे मा. आमदार मनोजदादा घोरपडे होय.

कर्तृत्वाचा वसा आणि वारसा : मा. मनोजदादांचे वडील माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. लोकनेते भिमरावदादा घोरपडे आणि त्यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती मंगलताई घोरपडे या दोघांच्या कर्तृत्वाचा वसा आणि वारसा जोपासत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत आमदार मनोजदादांची विकासात्मक वाटचाल सद्यस्थितीत चालू आहे.

मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं ! : कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे अशी दादांची ओळख आज महाराष्ट्र विधानसभेत आहे. परंतु, एका तपाहून अधिकचा काळ दादांनी अथक परिश्रम, सातत्य आणि वैयक्तिक जीवनासाठीचा फार मोठा त्याग केल्याचे संपूर्ण कराड उत्तर मतदार संघ जाणून आहे.

सामाजिक व राजकीय प्रवासास सुरुवात : सन 2012 मध्ये मा. मनोजदादांच्या मातोश्री श्रीमती मंगलताई घोरपडे या जिल्हा परिषद सदस्या असताना मनोजदादांनी मतदार संघातील प्रत्येक गावात कौटुंबिक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मा. मनोजदादांच्या नावापुढे कोणतेही पद नव्हते. असे असताना समाजाच्या, सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवायच्या, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे, काम करत राहायचे, फळाची अपेक्षा करायची नाही, एवढ्या लहानशा हेतूने दादांचा सामाजिक व राजकीय प्रवास सुरू झाला. कष्टाचं फळ एक ना एक दिवस मिळणारच! हा नियतीचा नियम आहे…… आणि इथूनच दादांच्या संघर्षाची सुरुवात झाली.

कडवी झुंज : सन 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदार संघातून मा. मनोजदादांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये कराड उत्तरची निवडणूक लढत पिढीजात, नेतृत्वाबरोबर दादांनी कडवी झुंज दिली. या निवडणुकीत अपयश आले तरी, कराड उत्तर मतदार संघाला सर्वसमावेशक, कल्पक, अभ्यासू, प्रयत्नवादी व प्रामाणिक नेतृत्व मिळाल्याची भावना जनतेत झाली.

जनसेवेचे व्रत स्वीकारले : “हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोहही कधी झाला नाही. नशिबात असेल ते मिळेलच, पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही. या उक्तीप्रमाणे, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून न जाता जनसेवेचे व्रत स्वीकारून दादांनी पुन्हा कामाला सुरुवात केली.

जिल्हा परिषदेत दिमाखात एन्ट्री : सन 2017 साली, सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये वर्णे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक जिंकून मनोजदादांनी सातारा जिल्हा परिषदेत दिमाखात एन्ट्री केली. जिल्हा परिषद गटात विविध विकासकामे, पायाभूत सुविधा, शिक्षण विषयक कामे करत असताना मनोजदादांनी प्रत्येक लहान-मोठ्या गावांत दांडगा जनसंपर्क निर्माण केला. गावागावातील पोरांपासून थोरांपर्यंत ‘मनोजदादा म्हणजे आपल्या हक्काचा माणूस’ वाटू लागले.

संपूर्ण जिल्हाभर कामातून वेगळी ओळख : सातारा जिल्हा परिषदेत देखील सक्षम व अभ्यासू जिल्हा परिषद सदस्य म्हणून दादांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या या कार्याची दखल घेत, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून काम करण्याची देखील संधी मिळाली. आता मनोजदादा घोरपडे हे नाव केवळ वर्णे जिल्हा परिषद गट किंवा सातारा तालुक्यातपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण जिल्हाभर दादांनी स्वतःच्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

लोकप्रिय नेतृत्वावर शिक्कामोर्तब : जनतेच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या व जनतेसाठी सदैव उपलब्ध होणाऱ्या या नेतृत्वाला कराड उत्तर मतदार संघ पुन्हा एकदा खुणावत होता. यातूनच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरच्या जनसेवेसाठी पुन्हा एकदा स्वतःला आजमावण्याचा निर्णय मनोजदादांनी घेतला. यावेळची निवडणूक अपक्ष लढवत असताना पुन्हा एकदा मनोजदादांना अपयशाला सामोरे जावे लागले. परंतु, मतदार संघात चांगली मते घेतल्याने मनोजदादा हेच कराड उत्तरचे लोकप्रिय नेतृत्व असल्याचं सिद्ध झालं.

साखर कारखाना उभारणीची स्वप्नपूर्ती : मनोजदादांचा हा प्रवास इथेच थांबत नाही. 2019 च्या निवडणूक निकालानंतर मनोजदादा दुसऱ्याच दिवशी एका कार्यकर्त्याच्या घरातील दुःखद प्रसंगी सहभागी होते. कराड उत्तर मतदार संघात पुन्हा एकदा मनोजदादा नव्या जोमाने व तयारीने कामाला लागले. सामाजिक व विकासात्मक कामाबरोबरच येथील सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला चालना देणे गरजेचे आहे, हे ओळखून साखर कारखाना उभारण्याचे स्वप्न दादांनी मनाशी बाळगले. खटाव माण साखर कारखान्याची उभारणी केली. खटाव माण साखर कारखान्याच्या को-चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारली.

मनोजदादांची सावली : मनोजदादांचे बंधू मा. संग्राम घोरपडे व विक्रमनाना यांच्या जोडीने खटावच्या उजाड माळरानात साखर कारखाना उभारणीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. आमदार मनोजदादांची सावली म्हणून ओळखले जाणारे मा. संग्राम घोरपडे हे खटाव-माण साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कामकाज पाहत आहेत. खटाव माण साखर कारखान्याचा यशस्वी व चढता आलेख पाहिल्यानंतर मा. दादांच्या कार्याचा व कल्पकतेचा निश्चितच अभिमान वाटतो. सातारा एम.आय.डी.सी. मध्ये दोन कारखाने, राज्यात व बाहेर सोलर प्रोजेक्ट्स उभारून हजारो रोजगार उपलब्ध केले.

मनोजदादांनी चक्रव्यूह भेदले : दरम्यानच्या काळात मनोजदादांची कराड उत्तरेत दिवसेंदिवस लोकप्रियता वाढू लागली होती. परंतु, संघर्ष, समस्या आणि अडचणी काही थांबत नव्हत्या. किंबहुना त्या निर्माण केल्या जात होत्या. साखर कारखान्याच्या बाबतीत घडलेला दुर्दैवी प्रसंग आणि त्या भोवती तयार केलेले चक्रव्यूवरूपी षडयंत्र भेदण्याचे आव्हान दादांसमोर उभे होते. संयम, धैर्य व धीरोदात्तची भूमिका घेत मनोजदादांनी हे चक्रव्यूह भेदले.

अनंत आमुची ध्येयासक्ती : विधानसभा निवडणुकीतील सलग दोन पराभव, तसेच निर्माण झालेले अनेक पेचप्रसंग या साऱ्यांना सामोरे जाऊन मनोजदादांनी त्यातून केलेला संघर्ष पाहिला की, कोलंबसाचे गर्वगीत आठवते,

     “अनंत आमुची ध्येयासक्ती,

           अनंत अन् आशा,

      किनारा तुला पामराला.”

         The show must go on, 

लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली : पुन्हा नव्याने सुरुवात करत, मनोजदादा कराड उत्तरेच्या मैदानात उतरले. कराड उत्तर मतदार संघातील गाव नी गाव, वाडी-वस्ती, वार्ड न वार्ड, प्रत्येक कार्यकर्ता, मतदार यांच्याशी वैयक्तिक संपर्क ठेवून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. लोकांच्या समस्या लक्षात घेतल्या. वेळीच योग्य ते उपाय शोधले. कायमस्वरूपीची कामे, तात्पुरती करता येण्यासारखी कामे अशा सर्व स्तरांवरील नियोजनातून लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली.

“मनोजपर्व”: सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे कराड उत्तरमध्ये ‘मनोजदादा आमदार म्हणजे मीच आमदार’ असे घोषवाक्य बनवून मतदारांनी स्वतः ही निवडणूक हातात घेतली. त्याचप्रमाणे समस्त कराड उत्तरमधील माता-भगिनींनी घरोघरी जाऊन आपल्या लाडक्या भावासाठी प्रचार केला. या सर्वांचाच परिपाक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महायुतीतील घटक पक्ष, अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट, आमदार, खासदार व प्रस्तापित यांच्या विरोधातील सर्व हितचिंतक या सर्वांच्या सहकार्याने मा. मनोजदादा घोरपडे यांनी कराड उत्तर मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे कमळ सर्वप्रथम फुलवले आणि कराड उत्तरच्या जनतेने, “मनोजदादा” या नावापुढे “आमदार” हे नाव जोडले व इथूनच कराड उत्तर मतदारसंघात सुरू झाले एक नवे पर्व- “मनोजपर्व”..!

दुष्काळमुक्तीचा ध्यास : मनोजदादा आमदार झाले आणि अपेक्षेप्रमाणे जनसेवेसाठी जनतेत रुजू झाले. सर्वप्रथम दादांनी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरवले. त्यानुसार तारळी लिंक कॅनॉल चालू करून कोपर्डे हवेली, मसूर, परिसरातील गावे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त केली. हणबरवाडी-धनगरवाडी योजना टप्पा क्र. 1 व 2 चालू केला. तसेच हणबरवाडी टप्पा क्रमांक दोन सु.प्र.मा. अन्वये 100 कोटी मंजूर करण्यासाठी दादांनी भगीरथ प्रयत्न केले आहेत. याशिवाय, इंदोली-पाल उपसा सिंचन योजनेचे पाणी आरक्षित करून सर्वेक्षण चालू केले. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास 60 लाख मंजूर करून यासारखे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. समर्थगाव/काशीळ उपसा सिंचन व गणेशवाडी उपसा सिंचन योजनांमुळे अनेक गावांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये यश आले आहे. गणेशवाडीचे 25 कोटींचे ट्रेंडर काढले आहे व पुढील काळात अनेक गावांच्या पिण्याच्या व शेतीविषयक पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे.

दृष्टा, अभ्यासू व संवेदनशील नेता : उंब्रज येथील पारदर्शक पुलासाठी 210 कोटी रुपये मंजूर करून लवकरच हे काम सुरू होत आहे. ग्रामीण अंतर्गत रस्ते, सभामंडप, रस्त्यांवरील पूल, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मागणीनुसार एसटी बसेसची सुविधा अशा कितीतरी सोयी-सुविधा पुरविण्यासाठीचे नियोजन व प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचे काम सद्यस्थितीत कराड उत्तर मतदार संघात चालू असल्याचे दिसत आहे. दूरदृष्टी असणारा दृष्टा, अभ्यासू व संवेदनशील नेता म्हणून आमदार मनोजदादा घोरपडे हे नावारूपाला येत आहेत.

विकासकामांची चौफेर घोडदौड : आरोग्य व नेत्रचिकित्सा शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिर, बांधकाम मजूर व गरजूंना  साहित्य वाटप, याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, कुस्त्यांचे आखाडे, बैलगाडा शर्यती इ. आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा या सर्वच क्षेत्रात आमदार मनोजदादांकडून सध्या मतदारसंघात विकासकामांची चौफेर घोडदौड सुरू आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या समस्या डायरेक्ट सोडवल्या जातात.

समर्थ साथ : आमदार मनोजदादांच्या या संघर्षमय प्रवासात खऱ्या अर्थाने ज्यांनी अतुलनीय बंधू प्रेमाचा आदर्श निर्माण केला, ते म्हणजे त्यांचे बंधू संग्राम (बापू) घोरपडे, विक्रम (नाना) घोरपडे,  त्याचबरोबर दादांच्या मातोश्री मंगलताई घोरपडे, मनोजदादांच्या सौभाग्यवती समताताई घोरपडे, वहिनी तेजस्विनी घोरपडे, श्री. कृष्णत शेडगे (मामा) या सर्वांची साथ व त्यागाचे मोल नाही.

वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा : मनोजदादांच्या आजच्या या जन्मदिनी दादांचे कौटुंबिक, सामाजिक, राजकीय स्नेहसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावेत व त्यांच्याकडून समाजसेवेचे हे व्रत अखंडित चालू राहवे, या सदिच्छांसह ‘दादा, आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा’!

संघर्षमय प्रवासातील सहप्रवासी : वाढदिवसाच्या शुभेच्छा देतेसमयी, सन 2012 पासून आजअखेर आपल्या संघर्षमय प्रवासातील एक सहप्रवासी म्हणून आपणाबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते,

नाही दहशत, नाही गुर्मी,

चाल चालतो नीतीची.

सर्वसामान्य जना-मनाची, 

ओळख ठेवतो कायमची.

शेतकऱ्याची नाळ आपली,

कपाळी माती कष्टाची.

राजकारण नव्हे; समाजकारण,

जपतो नाती रक्ताची.

घमेंड नाही; मस्ती नाही, 

शांत संयमी वृत्ती अशी. 

आडवा आला अखेर कोणी,

झेप दाखवी वाघाची. 

– शब्दांकन : 

जयवंत व्यंकटराव जाधव 

(निगडी वंदन, ता. जि. सातारा)

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!