कराडचे बसस्थानक राज्यात आदर्शवत करणार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले;  नवीन पाच एसटी बसेसचे लोकार्पण 

कराड/प्रतिनिधी : – 

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कराड बसस्थानकातील प्रवासी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच येत्या काळात कराड बसस्थानक हायटेक करून राज्यात आदर्शवत बसस्थानक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांतून कराड आगाराला मिळालेल्या नवीन पाच एसटी बसचे लोकार्पण आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, रणजीत पाटील, राजेंद्र यादव, राजेंद्र माने, काकासाहेब जाधव, आगार व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ, विक्रम हांडे, सागर पांढरपट्टे, चालक, वाहक, सर्व एसटी कर्मचारी उपस्थित होते.

कराड : बस वाहकाकडून रीतसर तिकीट घेऊन प्रवास करताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, समवेत माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह पदाधिकारी.

प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न : कराड बस स्थानकातून दररोज पाच ते सहा हजार लोक प्रवास करतात. परंतु, आगारात कमी बसेस असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत अनेकदा आंदोलनेही करण्यात आली, असे सांगत आ. अतुलबाबा भोसले म्हणाले, प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी कराड आगाराला बस उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वत: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. यावर मंत्री श्री. सरनाईक यांनी तत्काळ कराड आगाराला पाच बस उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्याचा आज लोकार्पण सोहळा पार पडला.

आणखी पाच बसेसची मागणी : आपण कराडसाठी आणखी पाच बसेस देण्याची मागणी मंत्री श्री. नाईक यांच्याकडे केली आहे. त्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवण्याचे आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले.

पाठपुरावा करणार : प्रवाशांच्या सोयीसाठी आपण कटीबद्ध असून कराडला आणखी पाच बस व आवश्यक कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी यावेळी सांगितले.

आणखी एका बसस्थानकासाठी प्रयत्नशील 

कराड तालुका विस्ताराने मोठा आहे. तसेच कराड बसस्थानकातील प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय व्हावी, यासाठी कराड परिसरात आणखी एक बसस्थानक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच याबाबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

प्रवासी, नागरिकांमधून समाधान 

कराड आगारामध्ये एसटी बसची संख्या कमी असल्याने आगार व्यवस्थापनाला लांब पल्याच्या बसफेऱ्या बंद कराव्या लागल्या होत्या. तसेच उपलब्ध असलेल्या जुन्या बसच्या माध्यमातून तालुक्यातील प्रवासी सेवा सुरू होती. मात्र, मुदत संपत आलेल्या बस खुप जुन्या झाल्या असल्याने त्या रस्त्यात वारंवार बंद पडण्याचे प्रकार घडत होते. याचा प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अखेर गेल्या दोन महिन्यांत आठ व आता पाच अशा एकूण १३ एसटी बस कराड आगाराला उपलब्ध झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कराड : नव्या कोऱ्या बसचे स्वारथ्य करताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले.

अतुलबाबांनी केले नव्या बसचे स्वारथ्य 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराड आगाराला नवीन पाच बसेस मिळाल्या. या नव्या कोऱ्या करकरीत बसचे स्वारथ्य करण्याचा मोह आमदार भोसले यांना आवडला नाही. त्यांनी बसचे स्टेअरिंग हातात घेऊन बसचे स्वारथ्य करण्याचा आनंद घेतला. तसेच बस वाहकाकडून रीतसर तिकीट घेऊन प्रवास करण्याचाही आनंद त्यांनी घेतला. त्यांच्यासोबत माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!