कराड उपजिल्हा रुग्णालयातील सेवा-सुविधा सुधारा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्राहक पंचायतचे शिष्टमंडळ सक्रिय; शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित कार्यवाही करण्याची मागणी

कराड/प्रतिनिधी : – 

शहरातील ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या विशेष मोहिमेंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील अधीक्षक डॉ. सुनिता लाळे यांची भेट घेऊन रुग्णालयातील सेवा-सुविधा, अपूर्णता आणि दैनंदिन कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी रुग्णालयातील विविध अडचणींची माहिती देऊन त्या पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

पुरेसे मनुष्यबळ आवश्यक : रुग्णाच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना दवाखाना, प्रयोगशाळा, एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. तपासण्या इत्यादींसाठी एकाच वेळी हॉस्पिटल सेवा, औषधे, रुग्णवाहिका, बिल भरणे, तसेच विविध तपासण्यांसाठी रुग्णांना दुसरीकडे पाठवणे यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. यामुळे रुग्णाच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीवर अतिरिक्त ताण येतो.

आवाहन : या पार्श्वभूमीवर, अशा सेवेची आवड असलेल्या, सेवाभावी वृत्तीने अल्प मोबदल्यात काम करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी किंवा सेवाभावी संस्था, मंडळे यांनी ग्राहक पंचायतचे अध्यक्ष नितीन शहा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती : या बैठकीस ग्राहक पंचायत कराड शहरचे अध्यक्ष नितीन शहा, कैलास थोरवडे, हिरालाल खंडेलवाल, डॉ. धनंजय खैर, संतोष पालकर, दत्ताजी खुडे-देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!