कराड/प्रतिनिधी : –
ज्याप्रमाणे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना जितेंद्र डूडी यांनी सैनिकांच्या समस्यांविषयी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना प्रतिनिधी, सैनिक फेडरेशन व सैनिक व त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांची बैठक बोलावली होती. सर्व अकरा तालुक्यात तहसीलदार कार्यालयामध्ये सैनिक कक्ष स्थापन करण्यासाठी परिपत्रक काढले होते. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातही सर्व तालुक्यांत सैनिक कक्ष स्थापन करण्यात यावे. जिल्हाधिकारी कार्यालयात सैनिक कल्याण अधिकारी, सैनिक व सैनिक कुटुंबियांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी माजी सैनिक प्रशांत कदम यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आश्वासित पुणे जिल्ह्यातही सर्व तालुक्यांत सैनिक कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू, तसेच सैनिक कल्याण अधिकारी, सैनिक व सैनिक कुटुंबियांची एक ते दोन आठवड्यामध्ये बैठक आयोजित करू, असे आश्वासित केले आहे. तसेच सातारा जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रशांत कदम यांच्यासह माजी सैनिक ॲड. राजेंद्र कदम माजी सैनिक विश्वास साळुंखे, माजी सैनिक संजय कदम, पपेश गोरे, शिवाजी पाटील उपस्थित होते.
