अथणी-रयत शुगर्सचे ऊस तोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

अथणी-शुगर्स लि. रयत युनिट शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२५-२६ साठी बुधवार (दि. ३०) रोजी अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर ऊस तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : सदर कार्यक्रमासाठी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, अथणी शुगर्सचे एक्झिकेटीव्ह डायरेक्टर योगेश पाटील, रयत युनिटचे युनिट हेड रवींद्र देशमुख, सर्व संचालक, खातेप्रमुख यांचे उपस्थितीत पार पडला.

…यांनी केले करार : यावेळी वाहतूक कंत्राटदार अभिजीत रामचंद्र पाटील, प्रकाश रंगनाथ पाटील, अजितकुमार नथुराम यमगर, आनंदा किसन कडव, भगवान जगन्नाथ गायकवाड, प्रदिप पाटील, भिकाजी मोरे आदी वाहनमालक यांनी करार केले.

आवाहन : कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२५-२६ करीता ७.०० लाख मे. टनाचे उदिष्ट असून त्यादृष्टीने वाहन मालकांनी कारखान्याकडे तोडणी वाहतूक करार करावा. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गळीतास पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील (दादा) यांनी केले.

उपस्थिती : सदर कार्यक्रमास कारखान्यातील अधिकारी कर्मचारी, तसेच सर्व वाहनमालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत रयत युनिटचे मुख्य शेती अधिकारी विनोद पाटील यांनी केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!