कृष्णा कारखान्याच्या ऊसतोडणी वाहतूक करारास प्रारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाकरिता ऊसतोडणी वाहतूक करारांचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला. कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे यांच्या शुभहस्ते व व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत तोडणी वाहतूकदारांना करारपत्रांचे वाटप करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संचालक संजय पाटील, जे. डी. मोरे, अविनाश खरात, विलास भंडारे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले यांची प्रमुख उपस्थिती होती.

गळीत हंगाम यशस्वी पार पडूया : व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सर्व ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांच्या सहकार्यामुळे कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी पार पडला. येणारा गळीत हंगामही आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडायचा आहे.

हंगामाचा कालावधी लहान : मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी ऊसतोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांना मार्गदर्शन केले. इथून पुढे गळीत हंगामांचा कालावधी लहान असणार आहेत. त्यामुळे नियोजनबद्ध तोडणी यंत्रणा राबवून आपण गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उपस्थिती : यावेळी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, एच. आर. मॅनेजर संदीप भोसले, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते आदींसह ऊसतोडणी वाहतूकदार व कंत्राटदार, गट अधिकारी व शेतकी कर्मचारी उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!