कराड/प्रतिनिधी : –
श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर संचलित आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
विविध उपक्रम : श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. त्यानुसार वासंतिक क्रीडा प्रशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्यसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचे कौतुकास्पद कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.
मार्गदर्शन : यावेळी क्रीडा प्रशिक्षणाविषयी डॉ. नवनाथ तुपे व प्रशिक्षक अल्लाबक्ष पटेल यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी हॉलीबॉलमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडू मनीषा राठोड हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्काराची शिदोरी : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराडचे पोलीस उपनिरीक्षक अजरुद्दीन शेख होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील संस्काराची शिदोरी जीवनामध्ये नेहमी उपयोगी कशी पडते, याची विविध उदाहरणे दिली. तसेच यासाठीच श्री मळाईदेवी शिक्षण संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा प्रशिक्षणासोबत पौष्टिक नाष्टाही दिला जातो, याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमासाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अरुणा कुंभार, उपमुख्याध्यापक ए.बी. थोरात, पर्यवेक्षक बी.जी. बुरुंगले, आदर्श ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख सौ. शिला पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी जाधव, विद्यार्थी, सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.
नियोजन : विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जे. एन. कराळे, सौ.एस.टी. कांबळे, डी.एस. शिंदे, सौ.एम.एम. लिंबारे, सौ. उर्मिला थोरात, सौ. सविता पाटील, आर.ए. माने, राजेंद्र पांढरपट्टे, शरद तांबवेकर यांनी शिबिराचे नियोजन केले.
विशेष मार्गदर्शन : क्रीडा शिबीरासाठी अल्लाबक्ष पटेल, गौरी सिंग, उज्वला रैनाक, संजय गरुड, प्रियांका पानवल, राहुल विरकर, सोपान इनामदार, संजय राठोड, हेमंत शिर्के, राहुल परिहार, सारंग थोरात, गजानन कुसुरकर, श्रीहरी यादव, प्रशांत गुजर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद तांबवेकर, सौ. ज्योती शिंदे यांनी आभार मानले.