कराड/प्रतिनिधी : –
माजी खा. स्व. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार (दि. २७) रोजी रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावर रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचे जाहीर व्याख्यान आहे.
वेळ व ठिकाण : सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या व्याख्यानासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन : या व्याख्यानात उमेश चव्हाण हे कराड व परिसरातील नागरिकांना वैद्यकीय मदत कशी मिळवावी, शासनाच्या उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाखो रुपयांच्या योजना कोणत्या, रुग्णांचे हक्क व अधिकार काय आहेत, कोणत्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे संपूर्ण बिल माफ होते आदी महत्वाच्या विषयांवर व्याख्यान देणार आहेत.
आवाहन : या व्याख्यानासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.