श्री गोरक्षण संस्था ट्रस्टतर्फे कराडमध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
देशी गायींचे आपल्या जीवनातील धार्मिक, आयुर्वेदिक आणि शाश्वत शेतीच्या दृष्टीने अमूल्य स्थान आहे. यांबाबत प्रबोधन करून जागृती निर्माण करण्यासाठी श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट, कराडच्या वतीने सोमवारी पारंपारिक शिवजयंतीचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशी गायींचे पालन व संगोपन : श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट, कराडच्या वतीने देशी गायींचे पालन व संगोपन केले जाते. तसेच गाईंचे धार्मिक, आयुर्वेदिक आणि शास्वत शेतीसाठी असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने देशी गायींचे पालन करावे, यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शनही केले जाते.
उद्देश : हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री गोरक्षण संस्था ट्रस्टतर्फे, कराडच्या वतीने शहरातील ‘भारतीय संस्कृतीचा केंद्रबिंदू देशी गाय व मानवी आरोग्याबरोबरच संपुर्ण पर्यावरणाचे रक्षण’ या विषयावर खेबवडे, ता. करविर, जिल्हा कोल्हापूर येथील गोतज्ञ अरुण पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कराड तालुक्यातील जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज असणार आहेत.
वेळ व ठिकाण : सोमवार (दि. २८) रोजी सायंकाळी ५.४५ वाजता गोरक्षण संस्था, गुरुवार पेठ, भाजी मंडई, श्रीचेंबर्स समोर, कराड येथे हे व्याख्यान होणार आहे.
आवाहन : तरी सर्व गोप्रेमी, धर्म बंधू, भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री गोरक्षण संस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
