कराड/प्रतिनिधी : –
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील श्रीमती तानुबाई वसंतराव वेळापुरे यांचे ९६ व्या वर्षी २२ एप्रिल २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
राजन वेळापुरे यांना मातृषोक : कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था, कराडचे चेअरमन राजन वसंतराव वेळापुरे यांच्या श्रीमती तानुबाई वेळापुरे या मातोश्री होत.
धार्मिक व आध्यात्मिक जीवन : तानुबाई यांनी धार्मिक व अध्यात्मात आपले जीवन व्यतीत केले. त्या आळंदी ते पंढरपूर आषाढी एकादशी पायी वारी अखंडपणे चालत होत्या. रेठरे बुद्रुक येथील विठ्ठल मंदिरातील दैनंदिन पूजा करण्याचे संस्कार त्यांनी आजपर्यंत जपले होते.
वारकरी सांप्रदायावर शोककळा : वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या वेळापुरे यांच्या कुटुंबात त्यांनी लहान ते थोरांपर्यंत मार्गदर्शन केले. त्यांच्या दु:खद निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दहावा विधी : दहावा कार्यक्रम विधी गुरुवार (दि. १) मे २०२५ रोजी रेठरे बुद्रुक येथील वैकुंठधाम येथे सकाळी ९ वाजता होणार आहे.
श्रद्धांजली : श्रीमती तानुबाई वेळापुरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली रेठरे बुद्रुक येथील वारकरी संप्रदाय, समस्त ग्रामस्थ, श्री कालिकादेवी परिवार, तसेच वेळापुरे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
