कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असल्याचे मत आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केले.
स्वार्थासाठी निवडणूक लढवली नव्हती : वैयक्तीक स्वार्थासाठी मी ही निवडणूक लढवली नव्हती, असे सांगत आ. घोरपडे म्हणाले, शेतकरी, सभासदांना न्याय मिळावा, सभासद मालक म्हणून कारखान्यात रहावा, या प्रामाणिक भावनेतून आम्ही स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेलो होतो.
सभासदांच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार : या पराभवाने खचून न जाता सभासदांच्या न्याय हक्कासाठी भविष्यातही लढत राहणार असल्याचे आ. घोरपडे यांनी यावेळी संगितले. तसेच या निवडणुकीत आमच्या सोबत राहणार्या सभासदांना आपण मनापासून धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.