धैर्यशील कदम; ‘सह्याद्रि’ स्वतःचा नावलौकिक पुन्हा मिळवेल
कराड/प्रतिनिधी : –
विधानसभा निवडणुकीनंतर ‘सह्याद्रि’चा विजय सुध्दा सोपा होता. परंतु, अहंकारी नेतृत्वामुळे, तसेच काही लोकांना आमच्यामध्ये मेळ बसू द्यायचा नव्हता. त्यामुळे विरोधात दोन पॅनेल झाले. परिणामी सभासदांनी विद्यमान व्यवस्थापनाला स्विकारले. मात्र, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.
विधायक कामाला मदत करू : आम्ही सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो, असे सांगत श्री. कदम म्हणाले, तसेच सह्याद्रि कारखाना स्वतःचा नावलौकिक पुन्हा मिळवेल, अशीही अपेक्षा करतो. आम्ही चांगल्या व विधायक कामाला मदत करू. तसेच ज्या ठिकाणी चुकीचे असेल, त्याला वेळप्रसंगी विरोधही करू.
‘सह्याद्रि’च्या विस्तारीकरणाची पाहणी करणार : तसेच येणार्या दहा-पंधरा दिवसांत कारखान्याचा सभासद म्हणून ‘सह्याद्रि’च्या विस्तारीकरणाची पाहणी करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी मी स्वतः कारखाना कार्यस्थळावर जाणार असल्याचेही श्री. कदम यांनी संगितले.
