स्वतःच्या आरोग्याची काळजी प्राथमिकतेने घ्यावी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण; कार्वेतील शिबिरात १४०० पेक्षा जास्त नागरिकांची मोफत तपासणी

कराड/प्रतिनिधी : –

कोणताही आजार अंगावर काढू नये. वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असल्याने कोणत्याही आजारावार तात्काळ उपचार होण्यासाठी तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः प्राथमिकतेने घेतली पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

मोफत आरोग्य शिबिर : कार्वे (ता. कराड) येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात भेट देत नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी पं.स. सदस्य नामदेवराव पाटील, इंद्रजित चव्हाण, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात, शब्बीर मुजावर, काँग्रेसचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विलास थोरात, रंगराव थोरात, विष्णू हुलवान, विठ्ठल हुलवान आदींसह कार्वे ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्वे : आरोग्य तपासणी शिबिरावेळी नागरिकांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.

आयोजक : माजी खा. श्रीमती प्रेमीलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, तसेच विश्वराज हॉस्पिटल व एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व संकल्प सामाजिक संस्थेच्या सहकार्याने कार्वे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

१४०० पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग : या आरोग्य शिबिरात जवळपास १४०० पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला.

…या सुविधांचा घेतला लाभ : या शिबिरात प्रामुख्याने डोळे तपासणी, अस्थिविकार, दंतरोग, शुगर, कान, नाक, घसा, स्त्रीरोग तपासणी, त्याचबरोबर सर्वसाधारण तपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!