माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा 78 वा वाढदिवस आज 17 मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे.

निवासस्थानी स्वीकारणार शुभेच्छा : वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज चव्हाण पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजल्यापासून शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे.

शालोपयोगी साहित्य आणण्याचे आवाहन : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ, हार, तुरे न आणता, शैक्षणिक उपयोगी साहित्य आणावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!