चोरे, पाल विभागाचा दुष्काळ संपणार – आ. मनोज घोरपडे
कराड/प्रतिनिधी : –
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालीच्या सभेमध्ये मनोजदादा घोरपडे यांच्यासाठी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. गेली बरेच वर्ष रखडलेली व केवळ कागदावर असलेली इंदोली व पाल उपसा सिंचन योजना 50 मीटरवरून 100 मीटर हेड करण्यासाठी राज्य शासनाकडून खासबाब म्हणून मंजुरी देण्यात आल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
मंजुरीसाठी पाठपुरावा : इंदोली व पाल उपसा सिंचन योजना गेली अनेक वर्ष रखडलेली होती. आ. मनोजदादा घोरपडे यांनी आमदार पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शासन स्तरावर, तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर अनेक बैठका केल्या. तसेच या योजनेतील सर्व अडथळे दूर करून योजनेस शासनाची परवानगी घेतली आहे.
योजना ठरणार वरदान : चोरे व पाल विभाग, तसेच उंब्रजच्या वरच्या वाड्या, चरेगाव विभागासाठीही ही योजना वरदान ठरणार असून येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उचावून त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती साकारण्यास मदत होणार आहे.
दुष्काळ संपणार : सदर योजनेस मंजुरी मिळाली असून लवकरात लवकर चांगल्या दर्जाचे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सोय करणार असल्याचे, तसेच चोरे, पाल विभागाचा दुष्काळ संपणार असल्याचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.
योजना मंजूरसाठी सहकार्य : या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खा. छ. उदयनराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, ना. छ. शिवेंद्रसिहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. मकरंदआबा पाटील, खा. नितीनकाका पाटील, ना. महेश शिंदे, आ. अतुलबाबा भोसले, धैर्यशीलदादा कदम आदी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य लाभले.
आमदार मनोजदादांचे मानले आभार : ही योजना मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विभागातील शेतकऱ्यांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच विभागातील शेतकऱ्यांनी आ. मनोजदादा घोरपडे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले आहेत.
