शेतीमित्र डाॅ. संदीप डाकवे यांची कलाकृती
कराड/प्रतिनिधी : –
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची बुधवार (दि.12) मार्च रोजी जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधत स्टोन आर्टमधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील शेतीमित्र डाॅ. संदीप डाकवे यांनी त्यांची अनोखी कलाकृती साकारली आहे.
अनोखे चित्र : “हिमालयाच्या संरक्षणासाठी सहयाद्री धावला” असे म्हटले जाते. त्यामुळे सहयाद्रीचा कणखरपणा चित्रातून व्यक्त करण्यासाठी डाॅ. डाकवे यांनी “स्टोन आर्ट”मधून यशवंतराव चव्हाण साहेबांचे अनोखे चित्र साकारले आहे. वेगळ्या शैलीतून डाॅ. डाकवे यांनी हे चित्र तयार केल्याने त्यांच्या कलेचे कौतुक होत आहे.
