कराडमध्ये आज जाहीर व्याख्यान
कराड/प्रतिनिधी : –
जागतिक महिला दिनानिमित्त आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त महिला समन्वय समिती आणि लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार (दि. ११) मार्च रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – एक प्रेरक व्यक्तिमत्व” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्देश : महाराष्ट्राच्या माहेरवाशीण इंदोरच्या तत्कालीन महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन सर्वांना व्हावे, या हेतूने महिला समन्वय समिती आणि लोककल्याण मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

प्रेरणादायी व्याख्यान : तरुण मुली, महिला याबरोबरच सर्वच नागरिकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवशाली इतिहासावर आणि जीवनावर आधारित प्रेरणादायी स्वरूपाचे हे व्याख्यान असणार आहे.
प्रसिद्ध वक्त्या : या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन प्रमुख प्रा. श्यामाताई घोणसे या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – एक प्रेरक व्यक्तिमत्व या विषयावर बोलणार आहेत.
वेळ व ठिकाण : आज मंगळवार (दि. ११) मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील स्व .वेणूताई चव्हाण सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जवळ, कराड येथेही व्याख्यान होणार आहे.
आवाहन : तरी सर्व बंधू-भगिनींनी या व्याख्यानास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन महिला समन्वय समिती आणि लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
