स्वराज्य सप्ताहानिमित्त आयोजन; मान्यवरांच्या हस्ते पक्ष वितरण
कराड/प्रतिनिधी : –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सूचित केल्याप्रमाणे कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र डुबल यांनी विविध उपक्रम राबवून स्वराज्य सप्ताह साजरा केला. यानिमित्त कराड तालुक्यामधील विविध शाळांमध्ये रांगोळी, वक्तृत्व, निबंध, चित्रकला आदी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. तालुक्यातील 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.
उद्देश : छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य बालवयापासून मुला, मुलांनी आत्मसात करावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बक्षीस वितरण : शिवजयंतीपासून सुरू झालेला हा सप्ताह 26 फेब्रुवारी रोजी संपला. या सप्ताहामधील स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेवाडी येथे पार पडला.
यशवंत विद्यार्थी : निबंध स्पर्धा आस्था टेके – प्रथम, रोशनी मोरे, आकांक्षा जाधव, वक्तृत्व स्पर्धा फातीमा मुल्ला, संस्कृती शिंदे, विश्वजीत देसाई आणि रांगोळी स्पर्धा सानवी देसाई, संस्कृती तडाखे, सोहम पाकले असे अनुक्रमे प्रथम तीन विजेत्यांना जिंतेद्र डुबल यांनी रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ही केले.
मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमाला मुख्याध्यापक भारती लोकरे, ज्येष्ठ शिक्षिका शोभाताई चव्हाण, स्वयंसेवक काजल नलवडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप उत्तम कोरडे यांनी केले. प्रमोद गायकवाड यांनी आभार मानले.
