येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली येथील प्रथितयश विधिज्ञ ॲड. चारुशिला लक्ष्मण चव्हाण यांची भारत सरकारच्या वतीने नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने त्यांना नोटरी व्यवसायाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
पाच वर्षांसाठी सेवा : ॲड. चारुशिला चव्हाण यांना भारत सरकारच्या वतीने कराडमध्ये पुढील पाच वर्षांसाठी नोटरी व्यवसाय करण्यासाठी हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्रथितयश विधीज्ञ : ॲड. चारुशिला चव्हाण या ब्रह्मदास पतसंस्था बेलवडे बुद्रुकचे चेअरमन मारुती मोहिते (आबा) यांची भाची आहेत. त्यांचे वकिलीचे शिक्षण कराड येथील लॉ कॉलेजमध्ये झाले आहे. त्या मागील १९ वर्षांपासून कराड येथे वकिलीचा व्यवसाय करत असून त्यांनी विविध न्यायालयीन खटल्यांमध्ये आपल्या पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे. सामाजिक कार्यातही त्या नेहमी अग्रेसर असतात. ॲड. चव्हाण सध्या कराड येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय येथे कार्यरत आहेत.
नोटरीचे महत्त्व : कायदेशीर दस्तावेज स्वाक्षरी करण्यासाठी अधिकृत व्यक्ती म्हणून नोटरी हे काम फार महत्त्वाचे आहे. व्यवहार योग्य रीतीने पार पाडले जातील, याची खात्री करण्यासाठी व फसवणूक रोखण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नोटरी केली जातात.