स्वा. सावरकर स्मृतिनिमित्त कराडमध्ये डॉ. नरेंद्र पाठक यांचे व्याख्यान
कराड/प्रतिनिधी : –
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार (दि. २६) रोजी साहित्य अकादमी, दिल्लीचे सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वा. सावरकर स्मारक समिती, कराडच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रक : या पत्रकात म्हटले आहे की, स्वा. सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वा. सावरकर स्मारक समिती, कराडच्या वतीने “सावरकर साहित्य-काल, आज, उद्या” या विषयावर साहित्य अकादमी, दिल्लीचे सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. २६) रोजी सायंकाळी ६.३० वाजता कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात हे व्याख्यान होणार आहे.
आवाहन : या कार्यक्रमास सावरकर प्रेमी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुभाषराव जोशी, श्री. अ. ढवळे, घ. त्र्यं. पेंढरकर, वि. पु. गोखले, वि. के. जोशी, अवधूत कुलकर्णी, डॉ. निखिल आगवेकर यांनी स्वा. सावरकर स्मारक समिती, कराडच्या वतीने केले आहे.
