श्री संतकृपाच्या विद्यार्थ्यांना ‘डुकाटी एनर्जिया’त नोकरीची संधी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

घोगाव (ता. कराड) येथील श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी अंतिम वर्षाच्या १२ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून डुकाटी एनर्जिया इंडिया प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीची संधी उपलब्ध झाली आहे.

पगारापेक्षा अनुभवावर भर द्या : कार्यक्रमाच्या सुरुवातीला डुकाटी एनर्जिया इंडिया प्रा.लि.चे सहाय्यक व्यवस्थापक (एचआर आणि अॅडमिन) मनोज जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कंपनीची माहिती विद्यार्थ्यांना देत उद्योगात काम करण्याच्या संधींविषयी विद्यार्थ्यांना जागरूक केले. तसेच कारकिर्दीच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पगाराकडे न पाहता उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यावर भर द्यावा. ज्ञान आणि कौशल्य आत्मसात केल्यास भविष्यात उत्तम संधी आपोआप उपलब्ध होतात, असेही त्यांनी सांगितले.

प्लेसमेंट : या प्लेसमेंट प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्लेसमेंट अधिकारी प्रा. महेश रेणके, प्रा. भाग्यश्री पाटील, पुनम यादव यांनी केले.

निवड झालेले विद्यार्थी : हर्षद जाधव, शंभूराज शेलार, प्राजक्ता शिर्के, करण सुतार, ओमकार पाटील, अनुराधा पाटील, विजय पुकळे, ऋषिकेश शेवाळे, जयेश पाटील, प्रथमेश शिर्के, अस्मिता पाटील आणि संकेत सुरेश पवार यांचा समावेश आहे.

अभिनंदन : विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालिका सौ. प्राजक्ता जोहरी, प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!