वाकुर्डे राखीव’चा थेंब अन् थेंब कराडला मिळणार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची ग्वाही; वाकुर्डे पाणीपुरवठा उपसा जलसिंचन योजनेसंदर्भात आढावा बैठक 

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्यातील वाकुर्डे पाणीपुरवठा उपसा जलसिंचन योजनेवर अवलंबून असलेले 22 हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी .47 टीएमसी पाणी राखीव आहे. या पाण्यातील थेंब अन् थेंब कराड तालुक्याला देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

आढावा बैठक : येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवार (दि. २१) रोजी दुपारी वाकुर्डे पाणीपुरवठा उपसा जलसिंचन योजनेसंदर्भात आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. 

कराड : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले.

उपस्थिती : बैठकीला टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, वारणा उपसा जलसिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, लघुपट बंधारे सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बूब, वर्ण उपसा जलसिंचन प्रकल्पाचे उपअभियंता अनिल लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

.47 टीएमसी पाणीसाठा राखीव : या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद आमदार डॉ. भोसले म्हणाले, या बैठकीमध्ये कराड तालुक्यासाठी वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेमध्ये .47 पीएमसी पाणीसाठा राखीव आहे. या पाणीसाठ्याच्या वापरासंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. वाकुर्डे योजनेच्या कराड तालुक्यातील लाभक्षेत्रातील तब्बल 22 सेक्टर जमीन ओलिताखाली येण्यासाठी .47 टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे. या योजनेवर असलेल्या कराड तालुक्यातील बंधाऱ्यांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

येळगाव, काले जिल्हा परिषद गटाची अडचण दूर होणार : या बैठकीमध्ये कराड तालुक्यासाठी राखीव असलेल्या पाण्याचा थेंब अन् थेंब कराड तालुक्याला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच वाकुर्डे योजनेचे नियमित पाणी सर्व परिसराला मिळणार असल्याबाबत प्रशासनाने खात्रीशीर शब्द दिला आहे. त्यामुळे दरवर्षी येळगाव आणि काले जिल्हा परिषद गटातील गावांची पाण्याची अडचण दूर होणार असून त्यांना नियमित पाणी मिळणार आहे.

सोलर सिडर : तसेच 8119 योजनेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 मध्ये धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यातील १९ टक्के पैसे शेतकऱ्यांना भरावी लागणार होते. त्याचाही भार कमी व्हावा, या दृष्टीने वाकुर्डे योजनेवर सोलर सिडर लावण्यासाठी त्याचे इस्टिमेट करण्याच्या सूचना आपण प्रशासनास दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी कराड परिसरातील विशेष प्रश्न मार्गी लावण्याचे बाबतीत सविस्तर चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

खर्च 54 कोटींवर : ओंड येथील बंदिस्त पाईपलाईन करण्याच्या संदर्भात इस्टिमेट करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. त्यासंदर्भात रेड्डीयार यांनी इस्टिमेट केले होते. त्यावेळी 25 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, तो आता 54 कोटींवर होणार आहे. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर शेवटची बैठक होऊन जलसंपदा विभागाला तो प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यामुळे येत्या काळात सदरच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम चालू होईल, असेही एका प्रश्नावर आ. डॉ. भोसले यांनी सांगितले.

‘कृष्णा’च लाईट बील भरणार : तसेच प्रत्येक गावाच्या पाण्याची मागणीसंदर्भात जलसंपदा विभागाने लेखी प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार त्यांना अपेक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच कराड तालुक्यात वाकुर्डे योजनेवर चार बंधारे असून जलसंपदा विभागाचे चार बंधारे आहेत. अशा एकूण आठ बंधाऱ्यांची सद्यस्थिती जाणून घेत त्यांच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाला पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाकुर्डे योजनेचे लाईट बिल कृष्णा कारखान्यामार्फत भरण्यात येत असून यावर्षीचेही लाईट बिल कृष्णा कारखाना देणार असल्याचे आ. डॉ. भोसले यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!