राजेंद्रसिंह यादव; शुक्रवार पेठेत सव्वा कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ
कराड/प्रतिनिधी : –
कराड शहरवासीयांना नागरी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. गटर्सबाबात सतत येणाऱ्या तक्रारी पाहता यापुढील काळात शहरात बंदिस्त गटर बांधण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून प्राप्त झालेल्या निधीतून व नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बंदिस्त गटार बांधण्यात येत असल्याची माहिती शिवसेना व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.
भूमिपूजन : येथील शुक्रवार पेठेत विविध ठिकाणी सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये किंमतीच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी राजेंद्रसिंह यादव बोलत होते.
कोट्यावधींच्या निधीतून फेज’टू’ची कामे : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या माध्यमातून कराडला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला मिळाल्याचे सांगत श्री यादव म्हणाले, यातून कराड फेज टूमधील कामे सुरू आहेत. जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीतून विविध प्रभागात रस्ते, गटर्स व इतर कामे सुरू आहेत. रस्ते करत असताना त्या भागातील गटर्स बंदिस्त करण्यात येत आहेत. हे गटर्स ड्रेनेज पाईपला जोडण्यात येते आहेत. या संकल्पनेमुळे आरोग्य विभागावरील ताण कमी होण्यास मदत होत आहे.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी सभापती स्मिता हुलवान, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, सुधीर एकांडे, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, विनोद भोसले, प्रीतम यादव, ओमकार मुळे, दिनेश यादव, ऋतुराज मोरे, रुपेश कुंभार, नुरुल मुल्ला, राहुल खराडे, दिनेश यादव, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र माने, प्रकाश पवार, शिवाजी माळी, अशोक पवार, विनायक चौकर, भैय्यासाहेब तवर, जयभारत, ओम व महारुद्र हनुमान मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
… या कामांचा समावेश : या विकासकामांत आझाद चौक ते सात शहीद चौक रस्ता बीएमबीसी करणे 28 लाख 32 हजार, मोरे घर ते माने घर रस्ता डांबरीकरण करणे 16 लाख 28 हजार, रंगार वेस महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरणाचे लोकार्पण 32 लाख 64 हजार, मारुती मंदिर ते जयभारत कमान रस्ता डांबरीकरण करणे 29 लाख 23 हजार, मडकी घर ते गुरसाळे ज्वेलर्स रस्ता बीएमबीसी करणे 18 लाख 34 हजार आदी कामांचा समावेश आहे.
