माजी आ. आनंदराव पाटील (नाना) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रम उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व महाराष्ट्र विधानपरिषदचे माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांचा वाढदिवस बुधवार (दि. १९) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक शैक्षणिक, कृषी, औद्योगिक प्रशासकीय सेवेतील मान्यवरांनी हितचिंतक व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून, तसेच फोन वरून आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

ग्रामदैवत दर्शन : सकाळी कौटुंबिक औक्षण केल्यानंतर आनंदराव पाटील (नाना) यांनी विजयनगर येथील ग्रामदैवत महाकाली देवीचे दर्शन घेऊन गावातील सर्व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर कराड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर मंगळवार पेठ येथील श्री ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करून कार्यकर्त्याच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कराड येथील निवास्थानी उपस्थित राहिले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. 

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव : 
प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सातारा जिल्हाचे पालकमंत्री शंभूराज देसाई,पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले, खा. नितीनकाका पाटील, आ. डॉ. अतुलबाबा भोसले, आ. सत्यजित देशमुख, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी भरत पाटील, कृष्णा कारखान्याचे चेअरमन सुरेशबाबा भोसले, माजी चेअरमन मदनदादा मोहिते, माजी चेअरमन इंद्रजीतबाबा मोहिते, ए. वाय. पाटील (कोल्हापूर), विनूबाबा भोसले, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील काटकर आदी मान्यवर आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

सत्कार व शुभेच्छा : वाईचे मोहन भोसले, अॅड. विजयराव कणसे, सातारा जिल्हा संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष निसार मुल्ला, भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष राधिका पन्हाळे, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तासिलदार, कराड कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महिंद्र जगताप, वाहतूक शाखा प्रमुख एपीआय संदीप सूर्यवंशी, हिंदुराव पाटील, डॉ. अशोकराव गुजर, शेतीमित्र अशोकराव थोरात, जयंतकाका पाटील, प्रकाश पाटील, राजेशआबा पाटील, माथाडी कामगार नेते बळवंतराव पवार, कराड उत्तर भाजप अध्यक्ष महेश जाधव, कराड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, उमेश शिंदे, अल्ताफ शिकलगार, रामचंद्र कोळी, माधवराव पवार, राजेंद्र यादव, विजयसिंह यादव, सुभाषराव डुबल, हनुमंतराव पवार, विजय वाटेगावकर, अतुल शिंदे, संजय शिंदे, घनशाम पेंढारकर, मोहसीन आंबेकरी, महादेव पवार, राजेंद्र माने, सुहास जगताप, शिवाजी पवार, पै. वासू पाटील, रणजीत पाटील, मुस‌द्दिक आंबेकरी, तसेच मलकापूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राजेंद्रआबा यादव, आबा गावडे, राजू मुल्ला, दिनेश रैनाक, उ‌द्योजक अक्षय सुर्वे, माजी पं.स. सभापती आनंदराव सुतार, उ‌द्योजक आर.टी. स्वामी, दादा शिंगण, मनसे कराड शहराध्यक्ष सागर बर्गे, शहाजी पाटील, श्रीकांत येडगे, अक्षय बक्षी, मानसिंगराव जगदाळे, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, निवासराव थोरात, धोंडीराम जाधव, दयानंद पाटील भाऊ, दत्ता देसाई, माजी संचालक, माणिकराव जाधव, वसंतराव शिंदे आप्पा, सलीम मुजावर, हर्षवर्धन मोहिते, माजी पं.स. सदस्य डॉ. राजेंद्र पाटील. विजय चव्हाण, आरपीआयचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, नितीन काशीद, शंकर खबाले, सैदापुरचे माजी सरपंच मोहनराव जाधव, डॉ. दिलीप पाटील, डॉ. पवार, शिव औंधकर, दक्षिण कराड भाजप तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, हिंदकेसरी पै. संतोष वेताळ, पै. वसीम मुल्ला, कुठरेचे सयाजी यादव, संजय पवार आप्पा, सौ. चित्रलेखाताई माने, सह्याद्री कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, माणिकराव पाटील, रामभाऊ पाटील, श्रीनिवास जाधव, देवकर साहेब, डी.डी. ठोंबरे सर, धनाजी जाधव, डॉ. शंकरराव पवार, मुरलीधर जाधव, आण्णा जाधव, जगन्नाथ मोहिते, नयीम कागदी, अदिल मोमीन, प्रमोद तोडकर, पै. किसनराव पाटील घोनशिकर, मुंढे माजी सरपंच आनंदराव जमाले, रमेश लवटे, सागर पाटील, अशोक माळी, तुकाराम घोडके, मोहम्मद आवटे, वारुंजीचे माजी सरपंच भास्करराव पाटील, अमित पाटील, कार्वेचे माजी उपसरपंच वैभव थोरात, महेश पाटील, संभाजी थोरात, शहाजी थोरात, हरीश पाटील, केसे गावचे सरपंच प्रदीप शिंदे, शेळकेवाडीच्या सरपंच सौ. सुनंदा शेळके, बेलवडे बुद्रुकचे माजी सरपंच सचिन मोहिते, दिलीप मोहिते, महेश मोहिते, जयप्रकाश पाटील-वाठारकर, आनंदराव घोडके, श्रीधर साळुंखे, पै. हिंदुराव पाटील, अरुण गोवारेचे माजी सरपंच सचिन काटवटे, रशीद थोरात, अभिजित थोरात, सागर थोरात, विश्वास भोसले, ओंडचे दादासो थोरात, मोहन गायकवाड, मुल्ला, अनिल गावडे, सयाजी देशमुख, अजय थोरात, सचिन कवार, आशिष थोरात, गिरीश पाटील, आशिष माने बबलू, अभिजित पवार, अर्जुन हुबाले, महादेव पवार आप्पा, वडोलीचे महेश साळुंखे, यादव फोटोग्राफर, सर्व पत्रकार बंधू प्रिंट व इलेक्ट्रोनिक मीडिया, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी सरपंच उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते, हितचिंतक यांनी आनंदराव पाटील (नाना) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

विविध उपक्रम उत्साहात : माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार व बुधवारी आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम उत्साहात पार पडले. या सर्व उपक्रमांस विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!