मलकापूर (ता. कराड) येथे गुरुवार (दि. २०) फेब्रुवारी रोजी संत श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री संत गजानन महाराज (शेगाव), मंदिर मलकापूरचे सेवाधारी हणमंतराव पवार यांनी दिली.
१४७ वा प्रकटदिन सोहळा : श्री संत गजानन महाराज मंदिर, मलकापूर येथे गुरुवार (दि. २०) फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता श्री संत गजानन महाराज प्रकटदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत साळशिरंबे (ता. कराड) येथील हनुमान भजनी मंडळातर्फे सांप्रदायिक भजन सेवा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री गजानन महाराजांची महाआरती संपन्न होणार आहे. तसेच दुपारी १२.३० ते ३.३० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी १२.३० ते ३.३० पर्यंत श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, मार्केट यार्ड, कराड यांची सांप्रदायिक भजन सेवा होणार आहे.
आवाहन : तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक – भक्तांनी घ्यावा, असे आवाहन श्री संत गजानन महाराज (शेगाव), मंदिर मलकापूरचे सेवाधारी हणमंतराव पवार यांनी केले आहे.