मा. आ. आनंदराव पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने होणार साजरा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन; निवासस्थानी स्वीकारणार शुभेच्छा 

कराड/प्रतिनिधी : – 

माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांचा वाढदिवस बुधवार (दि. 19) फेब्रुवारी रोजी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

पत्रकार परिषद : माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती  त्यांच्या निवासस्थानी सोमवार (दि.  17) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत वाढदिवस संयोजन समितीचे वतीने देण्यात आली. 

विविध उपक्रमांच्या आयोजन : बुधवारी वाढदिवसानिमित्त माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) सकाळी 8 वाजता विजयनगर (ता. कराड) येथे ग्रामदैवत महाकालीचे दर्शन घेऊन 8.15 वाजता विजयनगर येथील प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय आनंदराव चव्हाण व प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. त्यानंतर शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.

प्रीतिसंगमावर अभिवादन : प्रीतिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करणार आहेत. तसेच मंगळवार पेठेतील श्री ज्योतिबा  देवाचे दर्शन घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.

निवासस्थानी स्वीकारणार शुभेच्छा : सकाळी 10.30 वाजल्यापासून दिवसभर माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) बनपुरी कॉलनी, कराड येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

आवाहन : शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हितचिंतकांनी येताना हार, तुरे, पुष्पगुच्छ न आणता शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त वह्या, पुस्तके, पेन आदी साहित्य आणावे, जेणेकरून ते वि‌द्यार्थ्यांना देता येईल, असे आव्हान वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

शालेय साहित्य व खाऊ वाटप : दरम्यान, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंगळवार (दि. 18) रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने कराड येथील रिमांड होम येथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात येणार आहे. तसेच विजयनगर येथील गोशाळेला भेट देऊन चारा वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोळे (ता. कराड) येथील अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने विविध उपक्रमांनी माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती वाढदिवस संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. 

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी उपस्थित कराडचे नगरपालिकेचे माजी नगरसेवक माधवराव पवार, महादेवराव पवार, मलकापूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव (आर आबा), सैदापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच मोहनराव जाधव, उद्योजक आर. टी. स्वामी, कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुहास जगताप व राजेंद्र माने, मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक दिनेश रैणाक, राजू मुल्ला, शहाजी पाटील गजानन नागरी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव शिंदे, भरत देसाई, नईम कागदी, सुभाषराव पाटीलजीवाठारकर, रमेश लवटे, पै. हिंदुराव पाटील, संजय पवार, बळवंत पाटील, सुरेश खिलारे, निसार मुल्ला, फिरोज कागदी, दिलीप देशमुख, हरीश पाटील, राहुल जमाले, आखिल कोरबू, फैयाज नदाफ, किरण कदम, अभिजित पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!